आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन मेळावा संपन्न होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले आहे. या वर्धापनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाची बाजू घेऊन नेहमीच सेनेवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "तुमच्या किती पिढ्या सतरंज्या उचलणार आहात. बाहेर या आता. यामध्ये एक बेडूक ओरडतोच आहे. त्याला तेवढंच काम दिलं आहे. तुझी ऊंची केवढी, आवाज कसा? ऊंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा, डोळे कोणांसारखे माहिती नाही. जीव काय बोलतो काय ? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कोणतरी बाप ठरवा असं मी स्पष्टच बोलेन. आमची शिवसेना 59 वर्षांची झाली तरीही आमचा बाप, आमचे दैवत, आमचा भगवा आणि विचार एकच आहे.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "शेटजींची पालखी वाहण्यासाठी, शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली नाही. ही त्या मिंध्याला जाऊन सांगा", असेही म्हणाले.