Uddhav Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

विधानसभेतील नऊ मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात, उद्धव ठाकरेंसोबत फक्त आदित्य

मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. ते नॉट रिचेबल झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Political Crisis : कोकणातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. ते नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे विधान सभेतील दहा मंत्र्यांपैकी केवळ आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांच्या गटात राहिले आहे. राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित होते. शनिवारी उदय सामंत यांनी आपल उद्धव ठाकरे यांच्यांसोबतच असल्याचे लोकशाही मराठीशी बोलतांना सांगितले होते.

एकनाथ शिंदेंसोबत असलेले नऊ मंत्री

एकनाथ शिंदे (नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री)

गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री)

उदय सामंत (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री)

दादा भुसे (कृषी मंत्री)

संदीपान भूमरे (रोहयो व फलोत्पादन मंत्री)

बच्चू कडू (जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री)

अब्दुल सत्तार (महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री)

शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री)

राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री)

दरम्यान, एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहटीतील ब्लू रेडीयन्स हॉटेलमध्ये राहत आहे. आज सहावा दिवस असून लवकरच भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. अशातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यानंतर राज्यापाल राजभवनावर परतले आहेत. यामुळे राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग येणार आहे.

विधान परिषदेतून आलेले हे राहिले

अनिल परब, परिवहन, संसदीय कामकाज

सुभाष देसाई. उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

शंकरराव गडाख – (कॅबिनेट मंत्री) मृदा व जलसंधारण

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा