महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर १० जानेवारीला सर्वोच्च न्यायालायत सुनावणी होणार आहे.या सुनावणीचे वेळापत्रक १० जानेवारीला ठरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडील प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानुसार २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ठाकरे गटाकडून लेखी स्वरुपात संबंधित उत्तर सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलंय. त्यानंतर आता 10 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी सात सदस्यीय खंडपीठाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात सध्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरुय. याबाबत येत्या 10 जानेवारीच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कदाचित सात सदस्यीय घटनापीठाचा विषय मांडतील. त्यावेळी कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.