ताज्या बातम्या

Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; शिंदे गटाकडून आज युक्तिवाद केला जाणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदे गटानं बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली. 2 मार्चला झालेल्या मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाने युक्तिवाद सुरू केला. 

आज पुन्हा शिंदे गट युक्तिवाद करणार आहे. शिंदे गटाच्यावतीनं ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. आजही त्यांचा युक्तिवाद होईल. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने वकील मनिंदर सिंह आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. त्यामुळे आजच्या युक्तिवादानंतर आणखी किती दिवस युक्तिवाद सुरू राहील. तसेच आज या सुनावणीत काय युक्तिवाद होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला. या सर्वांनी एकत्र येत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सत्ता बदलाची सध्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ