(Ajit Pawar ) सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यावर माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपले मंत्रिपद सोडावे लागले. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा राजीनामा मागण्यात आला. त्यानंतर, माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा मंत्रालय काढून घेतले गेले आणि ते खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. पण आता यावर एक नवीन अपडेट समोर आले आहे. अजित पवार क्रीडा खातं सोडणार असल्याचे आणि ते आता दुसऱ्या आमदाराला दिलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आता मराठवाड्यातील कुणालातरी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत नवघरे यांना हे खातं मिळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत नवघरे यांना मंत्री पद मिळाले तर, मागील दोन दशकांपासून त्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान, अजित पवारांनी 'चंद्रकांत नवघरे यांना आमदार करा, मी त्यांना मंत्री बनवतो', असे आश्वासन दिले होते. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे नवघरेंचे मंत्रिपद मिळालं नव्हतं. आता मात्र, चंद्रकांत नवघरे यांची मंत्रिमंडळात एंट्री होईल, असे संकेत मिळाले आहेत.
थोडक्यात
सदनिका लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी ठरले
दोषी ठरल्यावर माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद सोडावे लागले
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली
त्यांचा क्रीडा मंत्रालय अजित पवारांकडे देण्यात आला
आता अजित पवार क्रीडा खातं सोडणार असल्याची चर्चा
खातं दुसऱ्या आमदाराला दिलं जाईल, असे राजकीय वर्तुळात रंगले