सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. अशातच आता बारामती येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. बारामती येथील छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेमध्ये अजित पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, "आज माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय? चांगलं चाललंय. माझ्या आजोबांच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं उत्तम चाललंय", असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुढे अजित पवार म्हणाले की, "आहे ते आहे ना. त्यात काय घाबरायचं? खरं आहे ते खरं आहे. पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून मला निवडून दिलं, खासदार केलं. काय अजित पवारांचं काम बघून केलं नव्हतं. नंतर त्याला त्याचं काम दाखवावं लागलं,' अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा झालेला श्रीगणेशा, त्यांना पहिल्यांदा मिळालेली संधी याबद्दल मोजक्या शब्दांत सांगितलं.
त्यामुळे आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या केलेल्या कौतुकामुळे खरच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता पुढे राजकारणात भूकंप होणार का? तसेच पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे.