ताज्या बातम्या

Raj Thackeray : "तर कानाखाली बसणारच...", राज ठाकरेंचा कडक इशारा

मिरा रोडवरील भाषणात राज ठाकरेंनी हिंदी सक्तीवरुन अमराठींना दिला कडक इशारा

Published by : Shamal Sawant

मिरा रोडमधील राज ठाकरे यांचे भाषण चांगलेच चर्चेत राहिले. काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर मनसेनं देखील मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला, या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येनं लोकं या मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी मिरा रोडमध्ये हिंदी सक्तीवरुन मराठी न बोलणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

राज ठाकरे यांनी अमराठी लोकांना चांगलाच दम दिला आहे. भाषणादरम्यान राज ठाकरे म्हणाले की, " मोर्चाला जमलेले महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले होते, त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढता, मनसे सैनिकांनी सांगितलं की हिंदी सक्तीविरोधात मोर्चा सुरू आहे, त्यानंतर तो म्हणाला की इथे हिंदीच बोलतात".

नंतर राज ठाकरे म्हणाले की, "त्या माणसाच्या अरेरावीमुळे कानफाटीत बसली. त्याचा निषेध म्हणून तिथल्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. विषय समजून न घेता कोणाच्याही दबावाखाली येऊन बंद पुकारला. इथे मराठी व्यापारी नाहीत का? किती दिवस दुकानं बंद करुन राहणार ? महाराष्ट्रात राहाताय तर शांतपणे राहा. मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच" असंदेखील राज ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Raj Thackeray : "गोळीबार करून मराठी माणसाला...", 'त्या' घटनेवरुन राज ठाकरे यांचा संताप

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांचं निशिकांत दुबेला खुलं चॅलेंज