शरद पवार यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जावे असं मत खुद्द शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. केंद्रामध्ये विरोधी पक्षात बसायचं की नाही? याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असंदेखील शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार गट आणि अजित पवार एकत्र येण्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. (Sharad Pawar-Ajit Pawar)
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. अजित पवार -सुप्रिया सुळेंनी एकत्र बसून ठरवावं. तसेच एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंचा असणार आहे. शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये हे वक्तव्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.