आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन सोहळा पार पडत आहे. शिवसेनेचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन मेळावे आज पार पडणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाबेह ठाकरे गट) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन किंग्ज सर्कल येथील श्री षण्मुखानंद सभागृहात पार पडत असून शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडत आहे. दरम्या आता उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
श्री षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मि ठाकरे यांची उपस्थिती बघायला मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनी संबोधित करण्यास सुरुवात केली. संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. जनतेचे मनोरंजन करण्याची जबाबदारी सरकारने घेतली असल्याची जहरी टीका केली आहे. त्याचप्रमाणे मंत्री भरत गोगावले यांनादेखील लक्ष्य केले आहे.
भरत गोगावले यांच्यावर टीका
मनोरंजनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. रोज काहीतरी नवीन देत आहेत. कुणीतरी एक मंत्री अघोरी विद्या करताना व्हिडीओ आला. हा हॉरर सिनेमा आपण पाहिला. या चित्रपटाचे निर्माते यांचाही कार्यक्रम सुरू आहे.
मोदी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्य आक्रमक असताना अचानक सैन्याला माघार घ्यायला लावली. ट्रम्प यांचा कॉल आल्यानंतर सगळी सूत्र हलवली. च ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना जेवायला बोलावतात आणि आय लव्ह यू पाकिस्तान म्हणतात. हे नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत. आणि हे मोदी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात? अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.