शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काल निवृत्तीचे संकेत दिले होते. यावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. अशातच आता भास्कर जाधव यांनी त्यांचे मत मांडले आहे. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांनी शिवसेनेमध्ये डावलंलं जात असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. अशातच आता भास्कर जाधवांनी या सगळ्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी नाराज नाही त्याबद्दल मी खुलासाही करणार नाही. मात्र माझ्याबद्दल जर कोणी सातत्याने बोलत असेल तर मला भाष्य करण्याची गरज वाटत नाही" असेही ते म्हणाले.
नंतर भास्कर जाधव म्हणाले की, "आतापर्यंत मी आठ वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे मला आता थांबावसं वाटत आहे. पण हे माझं वैयक्तिक मत झालं. 2022 पासून मी लढण्याचे काम करत आहेत. स्वतःच स्वतःबद्दल सातत्याने सर्टिफिकेट देणं मला जमत नाही. आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका स्वतःहून अंगावर घेण्याचा निर्णय मी घेतो. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी मी मैदानात उतरेन. ही जर नाराजी असेल तर गप्प घरी बसणं, पक्षाच्या कामात झोकून न देणं याला काय म्हणायचं ? त्यामुळे यामध्ये कोणत्याही नाराजीचा संबंध नाही", असेही भास्कर जाधव म्हणाले.