आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन मेळावा संपन्न होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले आहे. या वर्धापनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरच्या युतीबद्दलदेखील भाष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, "आम्ही एकत्र यायचं की नाही ? हे ठरवणारे तुम्ही कोण? आमचं आम्ही बघू ना काय करायचं ते. जे राज्याच्या मनात आहे तेच होणार" असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे. त्यामुळे आता राज आणि उद्धव एकत्र येणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.