Breaking News
Breaking News Tema Lokshahi
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update Live : हतनुर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले

Published by : Shweta Chavan-Zagade

हतनुर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले

हतनुर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 1 लाख 25 हजार 156 क्युसेकस् पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं हतनुर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा

वाशीममध्ये नदी-नाल्यांना पूर

वाशीम जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. काही ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने पिकाचे नुकसान व शेती खरडून गेली आहे. त्यातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील काही दिवसांत खंड पडलेला पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावल्याने खरीपातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असला तरी कोणती ही मोठी हानी झाली नाही मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात पेरण्या रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या धरणाचे दरवाजे उघडले

  • अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे १३पैकी ३ दरवाजे उघडले

  • अप्पर वर्धा धरणाचे१,५ व १३क्रमांकाचे ३ दरवाजे उघडले

  • वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे

  • अमरावती, वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला अलर्ट

  • -नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान विभागाने गुरुवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

पावसाचा विमानतळाला फटका

पावसाचा विमानतळाला फटका. सकाळी साडे दहा दरम्यान धावपट्टीवर दृश्यता ५०० मीटरपर्यंत खालावली. विमानतळ २० मिनिटे ठप्प. सुमारे १५ विमानांना अर्ध्या तासाचा विलंब. दोन उड्डाणे रद्द

भारतीय हवामान खात्याकडून पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे,कोल्हापूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सुशांत सिंह राजपूतला रिया चक्रवर्तीनेच ड्रग्ज अ‍ॅडिक्ट बनवलं; NCB नं सादर केले आरोपपत्र 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. जवळपास दोन वर्ष झाले तरी या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर : रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात

चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालीय. जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दारे 1 मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

गोसीखुर्द धरणाचे सगळे दरवाजे उघडले

आठव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून 28 दरवाजे अर्ध्या मीटर ने तर 5 दरवाजे 1 मीटर ने उघडले गेले आहेत. संपूर्ण 33 दरवाजातून 4286.7 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरुय.

ठाण्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात

मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे.

लोणावळ्यात टाटा पॉवर धरणात पाण्याची पातळी वाढली, नागरिकांना इशारा

सर्वांना याद्वारे कळविण्यात येते कि, लोणावळा धरण जलाशय पातळी सकाळी १०:०० वा ४.३० मी आणि साठा ७.८५ दलघमी (६६.९९%) असून सकाळी ७:०० ते १०:०० दरम्यान ७१ मिमी पाऊस झाला आहे. पूढील २४-३६ तासांत सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शकता आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे,पंचगंगेची पाणीपातळी सध्या 35 फूट 2 इंचावर.पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळ 43 फूट,पंचगंगा पात्रा बाहेर पंचगगेच्या परिसरातील भागात नदीचे पाणी

अहमदनगर जिल्ह्यात संततधार

जिल्ह्याच्या बहुतांश भागात सकाळपासूनच संततधार. गोदावरी नदीच्या पाणी पातळी थोडी घट तर भीमा नदीची पाणी पातळी वाढली. सकाळी ९ वाजता गोदावरी नदी – नांदूरमध्यमेश्‍वर विसर्ग ५८ हजार ६९७ क्यूसेस भीमा नदी - दौंड पूल विसर्ग : ५० हजार, ६४९ क्यूसेस

मुंबई भरती अलर्ट

भरती : 11:44 तास - 4.68 मीटर, 23:38 तास - 4.06 mt- अहोटी : 17:48 तास- 1.73 मीटर

गुरुपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच..हिंदुत्वाशिवाय विचार नाही..गुरुपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट.

Abhijeet Patil: अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला दिला पाठिंबा

"हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील", नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका