थोडक्यात
‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद होण्याच्या मार्गावर
‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद केल्यास लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात
लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा करणार
‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात येऊ शकतो. महाराष्ट्र शासनाकडून 1969 साली ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ सुरू झाली होती.
त्यानंतर आता ही ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर संघटनेकडून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत असून बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने केली आहे.