राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार आहे. यामागची कारणे:
TET निर्णयावर पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी.
TET निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू असलेली कारवाई थांबवावी.
जुनी पेन्शन योजना (म.ना.से. नियम 1982 व 84) पुन्हा लागू करावी.
शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी.
शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांनंतरची सुधारित तीन वेतन लाभ योजना लागू करावी.
15 मार्च 2024 चा संचमान्यता निर्णय रद्द करावा.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करावी.
शिक्षकांवरील अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम थांबवावेत.
विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी.
वस्तीशाळेतील शिक्षकांना मूळ नियुक्तीपासून सर्व लाभ द्यावे.
आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती धोरण रद्द करावे.
कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावा.
शिक्षकांचे इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.
शिवाजी खांडेकर यांनी याबाबत माहिती दिली आणि राज्यातील शिक्षक वर्गातील असंतोष वाढला असल्यामुळे हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.