राज ठाकरे यांनी "जे बाळासाहेबांना नाही जमले, इतरांना नाही जमले ते देवेंद्र फडणवीसला जमले आणि उद्धव ठाकरे यांनी अनाजीपंतांनी आमच्यातील अंतरपाट दूर केला अशी वक्तव्ये करत आज वरळी येथील सभा गाजवली. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावत मराठीच्या अस्मितेचा मुद्दा उचलून धरला. दरम्यान ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्यावर तोफ डागली माझ्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले बाळासाहेबांची इच्छा मी पूर्ण केली यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असणार असे त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या या एकीकरणाला मला जबाबदार ठरवले त्याबद्दल त्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.
त्याचबरोबर 'हा मराठीचा विजय उत्सव नव्हता. ही रूदाली होती. रुदालीसारखे भाषण ऐकायला मिळाले काहीं जणांची याबाबत असूयाही दिसली असेही ते यावेळी म्हणाले. २३ वर्ष महानगरपालिका क्षेत्रात असताना काय कामे केलीय ? या काळात मराठीचा ऱ्हासच झाल्याचे चित्र दिसले आहे. आजच्या भाषणामध्ये मराठी भाषेबद्दल एकही शब्द न बोलता केवळ आमचे सरकार पडले आम्हाला निवडून द्या.असेच ऐकायला मिळाले.
आजच्या भाषणामध्ये पराभवाचे दुःख केवळ अधोरेखित केले गेले असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुंबईतला मराठी असो किंवा अमराठी सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.