मान्सूनच्या आधीच महाराष्ट्रासह देशभरात पावसाचे आगमन झाल्यामुळे वातावरण आल्हाददायी झाले आहे. मात्र मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शिवाय याचा सर्वात मोठा फटका हा भाजीपाल्यांच्या आवकावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार कोसळाऱ्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींच दैनंदिन बजेट कोलमडलं आहे.