लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते. असे संजय राऊत म्हणाले.
राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. यामुळे भाजपाला त्यांची जागा दाखवता येईल. भाजपाला त्यांची जागा दाखवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देखिल त्यांनी सांगितले आहे.