ताज्या बातम्या

अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच भारी; भाजपाचा सुफडा साफ

अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच भारी

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट,अमरावती

अमरावती जिल्ह्यात सहा बाजार समितीची निवडणूक काल (28 एप्रिल) झाली. यामध्ये अमरावती वगळता अन्य पाच बाजार समितीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत चालली.आगामी विधानसभेची रंगीत तालिम या अर्थाने झालेल्या या निवडणुकीत महाआघाडी समर्थित पॅनलले सर्वच 5 पैकी 5ही बाजार समित्यांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.

यामध्ये तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व१८ उमेदवार निवडून आले, चांदूर रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप,मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार गटाचे १० संचालक विजयी झाले आहेत. नांदगाव खंडेश्वर मध्ये अभिजित ढेपे व अंजनगाव सुर्जी मध्ये काँग्रेसने विजय मिळवला या निवडणुकीत भाजप,शिंदे गट,प्रहार पॅनलचा पराभव झालेला आहे.

मोर्शी मध्ये खासदार अनिल बोंडे यांच्या पॅनलचा पराभव झाला जिल्ह्यातील पाचही बाजार समितीत भाजप व शिंदे गटाला यश मिळालं नाही त्या तुलनेत यशोमती ठाकूर यांनी आपला गड राखला विजया नंतर यशोमती ठाकुर यांनी कार्यकर्त्यांन समवेत गुलालांची उधळण करत मोठा जल्लोष केला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा