विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला आहे. महाराष्ट्रांमध्ये या यशाचे श्रेय लाडक्या बहीणींना दिले गेले. मात्र आता या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला न देता सगळे श्रेय साधू संतांना जाते असे रामानंदचार्य दक्षिण पिठाचे महंत नरेंद्र महाराज यांनी व्यक्त केले आहे.
निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने 'लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनअंतर्गत महिलांना 1500 रुपये मिळू लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींमुळे निवडणुकांमध्ये यश मिळाले असे म्हंटले जाऊ लागले. मात्र आता यावर नरेंद्र महाराजांनी जे वक्तव्य केले ज्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
काय म्हणाले नरेंद्र महाराज?
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळे होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही साधू-संतांनी परिस्थिती बदलली. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा काहीही परिणाम झाली. आम्ही हिंदू समाजातील लोकांना जागृत केले. ही काळाची गरज असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. तसेच अजित पवार यांना जास्तीत जास्त 10 ते 12 जागा मिळतील असे त्यांना वाटत होते. पण निकाल मात्र वेगळाच लागला. एकनाथ शिंदे यांना वाटते की हे सगळं काही त्यांच्या योजनांमुळे घडले. पण तसे नाही. या विजयामागे साधू संतांचे योगदान आहे.