महिंद्राची BE 6 Batman Edition कार बाजारात; केवळ 300 युनिट्स विक्रीस उपलब्ध महिंद्राची BE 6 Batman Edition कार बाजारात; केवळ 300 युनिट्स विक्रीस उपलब्ध
ताज्या बातम्या

महिंद्रा अँड महिंद्राने BE 6 Batman Edition ही खास इलेक्ट्रिक कार लॉन्च

महिंद्रा BE 6 Batman Edition: 27.79 लाखात लॉन्च, 682 किमी रेंज, 300 गाड्यांची मर्यादित उपलब्धता.

Published by : Team Lokshahi

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारसह चर्चेत आली आहे. BE 6 Batman Edition या खास व्हर्जनची सुरुवात कंपनीने केली असून, या सुपरकारची किंमत 27.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे.

या कारची नोंदणी 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून, ग्राहकांना 21,000 रुपयांची बुकिंग रक्कम जमा करावी लागणार आहे. 20 सप्टेंबरपासून विक्रीला सुरुवात होणार असून, हा दिवस ‘इंटरनॅशनल बॅटमॅन डे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. विशेष म्हणजे या मॉडेलच्या केवळ 300 गाड्याच बाजारात उपलब्ध असणार आहेत.

महिंद्राने या व्हर्जनसाठी अमेरिकन फिल्म स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्ससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कारप्रेमींसाठी हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे. BE 6 Batman Edition ही कार BE6 च्या Pack Three व्हेरिएंटवर आधारित असून, मूळ किमतीपेक्षा जवळपास 89,000 रुपयांनी महाग आहे.

डिझाईनच्या दृष्टीने कार अत्यंत आकर्षक आहे. सॅटिन ब्लॅक रंग, गोल्डन बॅटमॅन लोगो, व्हील आर्ट आणि बम्परवरील ग्लॉस फिनिश हे तिचे वैशिष्ट्य आहे. इंटिरियरमध्येही गोल्डन अॅक्सेंट्स, डॅशबोर्ड आणि सीट्सवर खास डिझाईन दिले आहे.

कारमध्ये 79kWh क्षमतेची बॅटरी असून, एका चार्जमध्ये तब्बल 682 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळते, असा कंपनीचा दावा आहे. या दमदार फीचर्समुळे आणि मर्यादित उपलब्धतेमुळे ही कार बाजारात ‘कलेक्टर एडिशन’ ठरण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Municipal Elections : "मागच्यावर्षी सत्तेची हंडी फोडली, यावर्षी मुंबईसह..." दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी फुकंले मनपा निवडणुकांसाठी रणशिंग

Donald Trump and Vladimir Putin : ट्रम्प यांची बदलती भूमिका युक्रेनसाठी धोक्याची घंटा! रशियाशी व्यवहार करणार्‍या देशांवर कोणतीही कारवाई करणार नाही

Latest Marathi News Update live : आज मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

Latest Marathi News Update live : मुंबई- उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद