ताज्या बातम्या

BMC Election 2026 : मतदानासाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते राहणार बंद

BMC Election 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

Published by : Varsha Bhasmare

BMC Election 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. मतदान आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईत गुरुवारी विविध मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन राबवण्यात येत आहे. त्यानुसार, 14 जानेवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते 17 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत शहरातील काही भागांमध्ये वाहतुकीवर निर्बंध लागू असणार आहेत.

दादर पश्चिम भागात राव बहादूर एस. के. बोले मार्ग, अशोक वृक्ष रोड आणि रानडे रोडवर 14 जानेवारी सकाळी 8 वाजल्यापासून 16 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश व पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. या रस्त्यांवरून केवळ स्थानिक रहिवासी आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

वरळी परिसरातही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. डॉ. ई. मोझेस रोडवर 16 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत प्रवेश आणि पार्किंगला बंदी असेल. कारण, याच भागात असलेल्या स्ट्राँग रूममध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, जी. एम. भोसले मार्गावर 14 जानेवारी मध्यरात्रीपासून 15 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत ईव्हीएम मशिनच्या वितरण व संकलनासाठी वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत.

पश्चिम उपनगरांतील सांताक्रूझ भागातही मतदान केंद्रांमुळे एन. एस. रोड क्रमांक 06 आणि टी. पी. एस. रोड क्रमांक 03 हे रस्ते 15 जानेवारी रोजी तात्पुरते बंद राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी सांताक्रूझमधील रिलीफ रोड पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 शांततेत पार पडावी यासाठी 28 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये 3 हजार पोलीस अधिकारी आणि 25 हजार पोलीस कर्मचारी, SRPF, QRT, BDDS, दंगल नियंत्रण पथक आणि गृहरक्षक दलाचा समावेश आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 100 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा