ताज्या बातम्या

Waves 2025 : ‘वेव्हज् २०२५’ परिषदेत निर्णय; नागपूरात उभारले जाणार 'हे' सर्वात मोठे थिएटर

नागपूर थिएटर: वेव्हज् २०२५ परिषदेत घोषणा, भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याचा उद्देश.

Published by : Team Lokshahi

‘वेव्हज् २०२५’ या विशेष परिषदेमध्ये शनिवारी एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठ्या पडद्याचे चित्रपटगृह उभारले जाणार आहे. नामवंत निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून, भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज चित्रपटगृह प्रेक्षकांना एक अविस्मरणीय आणि भव्य अनुभव देईल, असा विश्वास प्रकल्पाचे प्रमुखांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की, "भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून, या प्रकल्पामुळे देशभरातील चित्रपटविश्वाला नवचैतन्य प्राप्त होईल."

द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत म्हणाले की, “या प्रकल्पाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या चित्रपटगृहाच्या निर्मितीचा भाग होण्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी जोडलेला हा महत्त्वाचा टप्पा असून, भारतीय कला आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

विक्रम रेड्डी यांनी देखील प्रकल्पाची माहिती देताना म्हणाले की, “आंध्र प्रदेशमध्ये सध्या भारतातील सर्वात मोठा पडदा आहे. आता नागपूरमध्ये त्याहून भव्य स्क्रिनसह एक जागतिक दर्जाचे चित्रपटगृह साकारण्याचे आमचे लक्ष्य आहे.” या प्रकल्पामुळे केवळ चित्रपट प्रदर्शनाच्या दृष्टीने नव्हे, तर नागपूरचे नावही आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फिल्म डेस्टिनेशन’ म्हणून ओळखले जाईल, असेही रेड्डी यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा