बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण सध्या जोरदार चर्चा होत असताना, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची बातमी समोर आली. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे आणि इतर आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. तसेच आता अंजली दमानिया यांनी सरकारकडे धनंजय मुंडे यांच्यासह आणखी 10 जणांना सहआरोपी करा अशी मागणी केली आहे.
याचपार्श्वभूमिवर अंजली दमानिया म्हणाल्या की, "वाल्मीक कराडच्या सहकाऱ्यांनीच बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते. हे माहित असून सुद्धा एलसीबीचे जे गीते होते त्यांनी या सगळ्या टोळीला प्रचंड प्रमाणात मदत केली होती. त्यामुळे हे सगळे सहआरोपी झाले पाहिजेत. कायदा काय म्हणतो की, ज्यावेळेस प्रायमाफेसी पुरावे उपलब्ध असतील त्यावेळेस लगेच त्या घटनेवर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि एफ आय आर देखील रजिस्टर झाला पाहिजे".
अंजली दमानिया यांची मागणी
"तर माझी अशी मागणी आहे की, धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वेबेस आणि त्यांच्या पत्नी, एसपी बारगल, पीआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, श्री गिते (LCB)अधिकारी अशा 10 जणांना सहआरोपी करा आणि त्यांची स्टेटमेंट घ्या".
अंजली दमानिया यांना मिळालेली माहिती
"आता मला जी जी माहिती आली आहे. ती अशी आहे की, ती माहिती 7 तारखेला मी एसपींकेड पाठवली. एसपींनी ती सीआयडीकडे पाठवली आहे. ज्यावेळेस मी धनंजय मुंडे यांच्या साडू भावासोबत बोलले त्यावेळएस त्यांनी ही माहिती पुन्हा पुष्टी केली आहे. त्यामुळे ही सगळी माहिती खरी आहे. धनंजय मुंडेच सगळं करत होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग बोराडे असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचा काम देखील धनंजय मुंडेंच्या सेल फोनवरनं होत होतं". अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे.