नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि मुलांना काहीतरी वेगळं, चवदार हवं असेल, तर हा पदार्थ नक्की करून पाहा. बाहेरचे फास्ट फूड टाळून घरीच हेल्दी आणि खमंग असा पदार्थ सहज तयार करता येतो. थोड्याशा पोह्यांपासून बनणारे हे व्हेजिटेबल लॉलीपॉप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील.
मांसाहार न करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कमी वेळात, कमी साहित्यात तयार होणारा हा पदार्थ पाहुण्यांसाठीही खास ठरू शकतो.
लागणारे साहित्य:
पातळ पोहे, उकडलेला बटाटा, कोबी, गाजर, मटार, कांदा, हिरवी मिरची, आलं, कांद्याची पात, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, तीळ, तेल
कृती:
एका भांड्यात भिजवलेले पोहे आणि मॅश केलेला बटाटा एकत्र करा. सर्व भाज्या बारीक करून त्यात मिसळा. त्यात मीठ, मसाले, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर घालून मिश्रण नीट एकजीव करा.
या मिश्रणाचे छोटे गोळे करून स्टिक लावा, तीळ लावून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.
खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक असे पोह्यांचे व्हेज लॉलीपॉप तयार! चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा आणि सगळ्यांची वाहवा मिळवा.