ताज्या बातम्या

Homemade Kairi Panha Premix : घराच्या घरी तयार करा बाजारात मिळणारे 'हे' कैरीचं पन्ह प्रीमीक्स

कैरी पन्ह प्रीमिक्स: उन्हाळ्यातील कैरीचं पन्ह घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत.

Published by : Riddhi Vanne

उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे बाजारात कैरी पाहायला मिळत आहे. कैरीचं पन्हं हे सगळ्यांनाच प्यायला आवडतं. कैरीचं पन्ह प्रीमिक्स premix कसं बनवायचं याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. कैरीचं पन्ह प्रीमिक्स Kairi Panha premix बनवण्यासाठी प्रथम दोन किंवा तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या स्वच्छ पाण्यानी धुऊन घ्या. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात शिजण्यासाठी ठेवाव्यात. कैरीचीवरची साल मऊ झाली की एका चाळणीत नितळता ठेवा. साधारण 10 मिनिटांनी कैऱ्या थंड झाल्या आहेत का? याची खात्री करुन घ्या. त्यानंतर कैरीची वरची साल काढून आतला गर वेगळा करावा.

त्यानंतर गाळणीच्या मदतीने कैरीचा गाळ वेगळा काढून घ्यावा. कैरीचं पन्हं करण्यासाठी जितका गर मिळाला असेल तेवढीच खडीसाखर आणि पुन्हा त्या प्रमाणात गूळ घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड, एक चमचा भिजलेल्या जिऱ्याची पूड, एक चमचा सैंधव मीठ, एक चमचा काळं मीठ. चवीनुसार काळीमिरी पावडर आणि थोडंसं केशर मिसळावे. हे सर्व मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा. अर्ध्या तासांनी गुळ व्यवस्थित विरघळल्याची खात्री करा.

हे मिश्रण हवा बंद डब्यामध्ये मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. पन्ह्याचं हे प्रिमीक्स Premix फ्रीज refrigerator मध्ये दोन महिने चांगले राहते. आता जेव्हा पन्हं प्यायचे मन असेल, तेव्हा एका ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे प्रिमीक्स घ्या, यामध्ये माठातले थंडगार पाणी घ्या.चमच्यानी ढवळलं की तयार झालं. आपलं पारंपरिक उन्हाळी पेय आहे. चवीमध्ये कोणत्याही कोल्डड्रिंक किंवा सोड्याला मागे टाकणारं हे कैरीचं पन्हं शरीराला आतून गारवा देतं. शरीरातला जलांश भरून काढण्यास मदत करतं. उन्हाळ्यात मंदावलेल्या जाठराग्नीला प्रदीप्त करतं. आधुनिक वैद्यकानुसार कैरी सी व्हिटॅमिन (Vitamin C) आणि लोह Iron चा उत्तम स्रोत असते. याशिवाय प्रिमीक्स Premix बनवताना वापरलेली खडीसाखर granulated sugar शरीराला थंडावा देते. गुळ हा सुद्धा रक्तधातूसाठी चांगला असतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Odisha News : ओडिशामध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाचा नवा अध्याय; केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन प्रकल्पांना मंजुरी

Kabutarkhana Andolan : 'जैन समाजावर का कारवाई केली नाही?' मराठी एकीकरण समितीचा पोलिसांना सवाल

India-China Flight : लवकरच भारत-चीन थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या सूचना

Kangana Ranaut On Jaya Bachchan : "...म्हणून लोक तिचे नखरे सहन करतात", जया बच्चन यांच्या त्या कृतीवर कंगना रनौतची 'भांडकुदळ कोंबडी' म्हणत टीका