ताज्या बातम्या

मलायका अरोराच्या वडीलांनी केली आत्महत्या; राहत्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

मलायका अरोराच्या वडीलांनी आत्महत्या केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलायका अरोराच्या वडीलांनी आत्महत्या केली आहे. राहत्या इमारतीवरून उडी मारून त्यांनी स्वतःचे जीवन संपवलं आहे. मुंबईच्या राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीसांकडून तपास सुरु आहे.

सकाळी 9:00 च्या सुमारास त्यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. वांद्रे येथील राहत्या घरात ही घटना घडली. आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून जीवन संपवलं. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मलायकाचा घटस्फोटीत पती अरबाज खान कुटुंबियांसह वांद्रे येथील मलायकाच्या घरी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप