maldives president meets pm modi maldives president meets pm modi
ताज्या बातम्या

PM Modi meets Maldives President: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला

भारतीय पर्यटकांनी पर्यटनासाठी मालदीववर बहिष्कार टाकल्यानंतर तिथल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं पार मोडलं होतं. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

Published by : Team Lokshahi

भारत आणि मालदीवचे संबंध ताणले गेले होते. मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. भारतीय पर्यटकांनी पर्यटनासाठी मालदीववर बहिष्कार टाकल्यानंतर तिथल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं पार मोडलं होतं. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

मालदीवसाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव हा आपला मित्र देश असल्याचे म्हटले आहे. भारताने नेहमीच शेजारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. भारताने मालदीव सोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आज मोहम्मद मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारत आणि मालदीवमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सत्तेत येण्याआधी पासून मुइज्जू यांचा अधिक कल चीनकडे होता. मालदीवची आर्थिक परिस्थिती बिघडताच मुइज्जू यांना ही भारताचं महत्त्व कळलं. आता त्यांच्या भारत दौऱ्यात काही करारांवर सहमती दर्शवत मुइज्जू यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. भारत आणि मालदीव यांनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी $400 दशलक्ष किमतीच्या चलन अदलाबदलीच्या करारावर स्वाक्षरी झाली. मालदीवला यामुळे परकीय चलनाच्या साठ्याशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमध्ये रुपे कार्ड लॉन्च केलंय. रुपे कार्ड लॉन्च करताना पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात भारत आणि मालदीव हे यूपीआयच्या माध्यमातून जोडले जातील. चलन स्वॅप आणि रुपे कार्ड व्यतिरिक्त, दोन्ही देशांमध्ये इतर अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. मालदीवला भारताने मालदीवला 50 दशलक्ष डॉलर्सचे ट्रेझरी बिल आणखी एका वर्षासाठी वाढवून महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालदीवला मोठा दिलासा मिळाला आहे. उद्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष ताज महालला भेट देणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा