नाशिकच्या मालेगावात पिकविम्याचा 4 कोटींचा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट शेतकरी बनून, NA प्लॉटवर, शेती महामंडळाच्या जागेवर शेती केली. खरीप हंगाम 2024 या वर्षात मालेगाव तालुक्यातील 17,333 शेतकर्यांनी एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेचा फॉर्म भरला. यात कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शासनाच्या अस लक्षात आल की काही शेतकऱ्यांनी कांदा पीक नसतांना पीकविमा काढला. त्यामुळे कृषी विभागामार्फत एक पथक नेमण्यात येवून याची पाहणी केली असता तालुक्यात आत्ता पर्यंत 107 शेतकरी यात दोषी आढळले.
तर जवळपास 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीकविमा काढल्याच निष्पन्न झालं. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. या चौकशीत आणखी धक्कादायक बाब अशी समोर आली की या 107 शेतकऱ्यांपैकी 71 हे बनावट शेतकरी निघाले असून त्यांनी 422 हेक्टर वर पीक नसतांना ही पीक विमा काढला. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. कृषी विभाग व पीकविमा कंपनी अधिकारी व कर्मचारी या पथकाने तालुक्याच्या ठिकठिकाणी जावून पाहणी केली. दोषी असलेल्या 107 शेतकऱ्यांची नावे पोर्टल वरून कमी करण्याचे काम कंपनी तर्फे सुरू करण्यात आले आणि त्यांचाही अहवाल त्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठवला.