थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Malegaon Crime ) मालेगाव पुन्हा हादरले असून धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी आता 54 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार गिरणा धरण परिसरात घडला असून शाळेतून घरी येत असताना आरोपीने मुलीला फूस लावून दुचाकीवरुन गिरणा धरणाकडे नेले आणि त्या मुलीला बळजबरीने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. स्थानिक लोकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.
Summery
मालेगाव पुन्हा हादरले; 14 वर्षीय मुलीचा विनयभंग
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये संताप
नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी