थोडक्यात
कपिल शर्मा धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई
कपिल शर्माला धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल येथून आरोपीला केली अटक
(Kapil Sharma) कपिल शर्माला धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल येथून या आरोपीला अटक केली आहे. दिलीप चौधरी असे या आरोपीचे नाव आहे.कपिल शर्मा याला चौधरी याने 22 आणि 23 सप्टेंबर धमकीचे 7 कॉल केले होते.
आरोपीला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलं जाणार असून त्याला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.कुख्यात गुंड रोहीत गोद्रा आणि गोल्डी बार यांच्या नावाने धमकी देत त्याने 1 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती.
यावेळी चौधरी याने कपिल शर्मा याला काही चित्रफितीही पाठवल्या होत्या. वेगवेगळ्या क्रमांकावरून हे धमकीचे फोन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे.