Sex Team Lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक : संभोग केल्यानंतर १० मिनिटांतच गेली स्मरणशक्ती

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक अशा गोष्टी ऐकायला किंवा पाहायला मिळतात.

Published by : Siddhi Naringrekar

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक अशा गोष्टी ऐकायला किंवा पाहायला मिळतात. ज्या गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडतात आणि बुचकळ्यात पाडू शकतात. अशीच एक घटना (Incident) घडली आहे.

काही ठिकाणी आपल्याला असे वाचायला किंवा ऐकायला मिळते जिथे दररोज सेक्स (sex) करणे हे चांगल्या स्मरणशक्तीसाठी महत्वाचे म्हटले जाते. मात्र याच्याविरुद्ध एक घटना घडली आहे.

सेक्समुळे एका पुरुषाची स्मरणशक्ती (Memory) कमी झाली, त्याला कोणतीच गोष्ट आठवत नाही. ही बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. सेक्समुळे पुरुषाची अल्पकालीन स्मरणशक्ती कमी झाली आहे,

संभोगानंतर स्मरणशक्ती 10 मिनिटांनी कमी

आयरिश मेडिकल जर्नलच्या मे आवृत्तीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, असे समोर आले आहे की, पत्नीसोबत सेक्स केल्यानंतर एका पुरुषाची स्मरणशक्ती कमी झाली. संभोगानंतर 10 मिनिटांनंतर 66 वर्षीय व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले.

असाच प्रकार 7 वर्षांपूर्वीही घडला

सात वर्षांपूर्वीही एका व्यक्तीला पत्नीसोबत सेक्स (Sex with wife) करताना असाच स्मृतिभ्रंश झाला होता. आयर्लंडमधील लिमेरिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी हे सांगितले. या प्रकरणात असे दिसून आले आहे की ती व्यक्ती ट्रान्झिएंट ग्लोबल अॅम्नेशिया (TGA) म्हणजेच अचानक स्मरणशक्ती कमी होण्याची तात्पुरती समस्या आहे.

यामागचे नेमकं कारण काय?

TGA 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. संशोधक या घटनेला TGA च्या जुनाट आजाराशी जोडण्याचा विचार करत आहेत. 50 ते 70 वर्षे वयाच्या व्यक्तीला असे होऊ शकते असा त्यांचा विश्वास आहे.

डॉक्टरांच्या मते, क्षणिक जागतिक स्मृतिभ्रंश मायग्रेन, शारीरिक व्यायाम, गरम-थंड पाणी, भावनिक ताण, वेदना आणि लैंगिक संभोग यांच्याशी जोडलेले आहे. त्याची पुनरावृत्ती दर 6-10 टक्के दरम्यान असू शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द