ताज्या बातम्या

Manipur : मणिपूरमधील घटनेने देश हादरला

मणिपूरमधील घटनेने देश हादरला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मणिपूरमधील घटनेने देश हादरला आहे. मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका समुदायाच्या जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली असून शेतात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात