राज ठाकरेंवर निवडणुकीदरम्यान ते भूमिका बदलतात असे आरोप करण्यात आले होते, याच आरोपांवर राज ठाकरेंनी त्यांच्या मुंबईत झालेल्या सभेत सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांची यादी वाचून दाखवली आहे. तसेच त्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसवर देखील हल्लाबोल केला आहे. इतर पक्ष काही करतील ती त्यांची परिस्थिती आणि आम्ही केलं की भूमिकेत बदल, असं का? असा प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे काय बोलतील त्याचा नेम लावण कठीण
भूमिका बदलणं हा राज ठाकरेंचा स्थायीभाव आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर केली आहे. शिवसेनेवर बोलून ते एक प्रकारे बदलत्या भूमिकांच समर्थनचं करत आहेत. राज ठाकरे आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील याचा अंदाज लावता येत नाही... त्यांचा स्वभाव हा भूमिका बदलणारा आहे, ते 2014 नंतर 2019 आणि आता बिनशर्त पाठिंबा नंतर विधानसभेला ते म्हणाले की, आमच्या शंभर जागा निवडून येतील आणि पुढचं सरकार आम्हीच ठरवू त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर काय बोलायचं