मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला येथे मंगळवारी मध्यरात्री एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीने मोठे उग्र रूप धरण केले आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 12 बंब घरणस्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
मानखुर्द येथील मांडला परीसारात भांगाराचे दुकान आहे. या ठिकाणी पुस्तकांची रद्दी, जून पेपर तसेच इतर भंगरातील वस्तु जमा केल्या जातात. याच दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. सुरवातीला दुकानातून धूर येताना दिसला. दरम्यान, भंगरांच्या वास्तूत पेपर आणि पुस्तके असल्याने आगीने उग्र रूप धारण केले.आग वेगाने पसरल्याने नागरिक दहशतीत आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाल पाचारण केले. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. या आगीच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.