आज नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. यादरम्यान विजय वड्डेटीवार यांनी मराठी आरक्षक मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली होती. यावर आज जालन्यात बोलत असताना मनोज जरांगेंनी देखील वड्डेटीवारांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की, "जोपर्यंत काँग्रेसचा सुफडा साफ होत नाही तोपर्यंत गप बसत नाही वाटतं. कारण तो छगन भुजबळ यांच्या विचाराच्या आहारी गेला आहे. जो नेता छगन भुजबळ च्या आहारी गेला तो नेता संपल्याशिवाय राहत नाही. छगन भुजबळ यांच्या षड्यंत्रात विजय वडेट्टीवार सुद्धा गुतला आहे. चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्ष नेता होता, चांगलं काम करत होता. परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाल्याचं त्यांना कळल आहे. काँग्रेसचा महामोर्चा, काँग्रेसचा मोर्चा होता दीड छटाक होते का?"
मराठा समाजाला 48 टक्के आरक्षण आहे असं वडट्टीवार म्हणाले होते. यावर बोलताना जरांगे म्हणालेकी, "ते येडं झालं, ते आता प्युअर येडे झालं. त्याला हे दिसत नाही कितीतरी जाती ओबीसी मध्ये आल्या त्यांच्या जागा कमी झाल्या. ज्या जाती ओबीसी मध्ये बसत नाही त्या त्यांना चालतात. जो समाज मागासवर्गीय आयोगाची निकष पूर्ण करत नाही तो समाज सुद्धा त्यांना ओबीसी मध्ये चालतो. त्यांना दुखणं आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा आहे. फक्त मराठ्यांना काही नाही मिळालं पाहिजे, तुला ओबीसीचा एवढा पुळका येतो, एवढी माया येते इथून मागे मोर्चा काढायचा ना. त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी राग आणि द्वेष आहे".
तसेच पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, "बकर शब्द छगन भुजबळचा आहे, हे छगन भुजबळ च्या आहारी गेलेले लोक आहेत. परळीची एक लाभार्थी टोळी. आज पासून त्याला किंमत द्यायची नाही त्याची काय अवकात आहे. तू आता सगळं काँग्रेस संपायला लागला. ओबीसींचा मोर्चा नाही जातिवादी अलिबाबाचा मोर्चा निघतो आहे. ओबीसीचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही, तो काय धनगरांना एसटीतून आरक्षण द्या म्हणतो का? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला".