ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : कडक उन्हामुळे जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; केलं रुग्णालयात दाखल

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना अचानक भोवळ आल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना सनस्ट्रोक आणि अतिसाराचा त्रास झाल्याचे स्पष्ट केले असून पुढील आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

कडक उन्हामुळे प्रकृतीवर परिणाम, तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पार

मनोज जरांगे यांना मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. आज बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांना संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. विनोद चावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० नंतर तापमान ४४ अंशांवर पोहोचले होते. अशा उष्णतेत दौरे करताना शरीराला प्रचंड थकवा येतो आणि त्यामुळेच त्यांना सनस्ट्रोकचा फटका बसल्याचे संकेत आहेत.

रक्तदाबात घसरण, शरीरात पाण्याची कमतरता

त्यांची तपासणी करताना रक्तदाब कमी आढळला, त्यामुळे चक्कर येण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शरीरात पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा थेट परिणाम हेही कारणीभूत ठरले. डॉक्टरांनी सध्या सगळ्या चाचण्या सुरू केल्या असून त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

डॉक्टरांचा सल्ला, पुढील ८-१० दिवस विश्रांती आवश्यक

जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असली, तरी त्यांच्या दैनंदिन दौऱ्यामुळे शरीरावर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यांना पुढील आठ ते दहा दिवस कोणताही दौरा किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत