Maratha Reservation : मनोज जरांगेंना मोकळा श्वास ! 'या' तारखेपर्यंत सुनावणी तहकूब; आंदोलकांना न्यायालयाचा इशारा Maratha Reservation : मनोज जरांगेंना मोकळा श्वास ! 'या' तारखेपर्यंत सुनावणी तहकूब; आंदोलकांना न्यायालयाचा इशारा
ताज्या बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगेंना मोकळा श्वास ! 'या' तारखेपर्यंत सुनावणी तहकूब; आंदोलकांना न्यायालयाचा इशारा

मनोज जरांगे: मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाची सुनावणी तहकूब, आंदोलकांना नियमभंगाचा इशारा.

Published by : Riddhi Vanne

Bombay High Court Hearing On Manoj Jarange :  मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर आज (२ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही कार्यवाही झाली. यावेळी आंदोलकांच्या वतीने वरिष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली, तर राज्य सरकारचे प्रतिनिधित्व महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केले. न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले की, आंदोलक सातत्याने नियम मोडत आहेत. त्यांना केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती, मात्र त्याचे उल्लंघन झाले.

न्यायालयाने यापूर्वी दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कठोर शब्दात आंदोलकांना सुनावले. “24 तासांचीच परवानगी होती, मग अजूनही तुम्ही तिथे का थांबलात?” असा सवाल खंडपीठाकडून करण्यात आला.

यावर मानेशिंदे म्हणाले की, आम्ही शांततेत बसलो आहोत आणि आतापर्यंत ५४ मोर्चे कोणत्याही अनुशासनभंगाशिवाय पार पडले आहेत. तरीदेखील न्यायालयाने पुन्हा विचारले, “तुम्हाला कोणत्या अधिकाराने बसण्याची परवानगी आहे? परवानगीशिवाय बसणे नियमभंगच आहे.”यानंतर मानेशिंदे यांनी न्यायालयाकडे उद्यापर्यंत मुदतवाढ मागितली. अखेरीस उच्च न्यायालयाने सुनावणी 3 सप्टेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे जरांगेंना काहीसा दिलासा मिळाल्याचे मानले जाते.

दरम्यान, सरकारच्या बाजूने महाधिवक्ता सराफ यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत सांगितले की, आंदोलनकर्त्यांकडे अजूनही मोठ्या संख्येने गाड्या आणि लोक आहेत. काही लोक प्रशासनाचे ऐकत आहेत तर काही अजिबात सहकार्य करत नाहीत. पोलिस सातत्याने विनंती करत आहेत, मात्र आंदोलक जागा रिकामी करत नाहीत. यावर न्यायालयाने सरकारलाही फटकारले. “50 हजारांपेक्षा अधिक लोक जमा होईपर्यंत तुम्ही काय करत होता? वेळेत कोर्टात अर्ज का दाखल केला नाही? आदेश मोडण्यात तुम्हीही कमी नाही,” असे स्पष्ट शब्दांत कोर्टाने सुनावले.

शेवटी, मानेशिंदे यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांना माघारी फिरवण्यासाठी आणि गाड्या हटवण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. कायदा-सुव्यवस्था ढासळणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विविध मागण्यांसाठी मनसेचे मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन

Piyush Goyal On GST : " जीएसटी सुधारणा म्हणजे..." जीएसटी सुधारणेबाबत पियूष गोयल यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut On Chhagan Bhujbal : “भुजबळ नाराज असतील तर राजीनामा द्यावा” संजय राऊतांचा सरकारवर टोला

Delhi Heavy Rain : दिल्लीत मुसळधार पाऊस; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी