ताज्या बातम्या

जरांगेकडून भुजबळांवर खालच्या शब्दात टीका

मनोज जरांगे यांची आज बीड मध्ये निर्णायक इशारा सभा पार पडली आहे. या सभेत बोलताना जरांगे पाटलांनी येवल्याचा येडपट म्हणत छगन भुजबळांवर खालच्या शब्दात टीका केली आहे.

Published by : shweta walge

मनोज जरांगे यांची आज बीड मध्ये निर्णायक इशारा सभा पार पडली आहे. या सभेत बोलताना जरांगे पाटलांनी येवल्याचा येडपट म्हणत छगन भुजबळांवर खालच्या शब्दात टीका केली आहे.

ते म्हणाले की, येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, भुजबळ आता मला साहेब म्हणू लागले. आधीच नीट वागला असता तर बरं झाले असते. महाजन म्हणाले की, आम्ही भुजबळांना समज दिली. याला मंत्री कुणी केलं.आरक्षण मिळूदे तुला कचका दाखवतो. आम्ही गप बसलो की तो काड्या करतो. एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो असा इशारा जरांगे पाटलांनी भुजबळ यांना दिला आहे.

हा मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय. मी मराठ्यांच्या चरणी नतमस्तक करतो. मराठ्यांना आता त्याचा लेकरांचे आरक्षण हवं आहे. मराठे कसे आरक्षण आणतात तुम्ही बघाच. मुंगीलाही शिरता येणार नाही अशी मराठा समाजाची एकजूट. सभेत जागा सोडेल तो मराठा नाही. असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा