काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे आंदोलन मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात . मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबरला आजाद मैदानात आमरण उपोषण केलं होतं .परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता-