हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यानंतर मनोज जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
यानंतर मनोज जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत मला बघायचंय' असं जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून आता संशय व्यक्त केला जात आहे.
"मात्र ते मला बघायचे आहेत त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवालीत यावं असं आवाहन करतो, ते जर शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार असेल तरी मी बरोबर करणार आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिले असतील तरी मी पुढे काय करायचं हे सांगणार आहे." दरम्यान मी यावर उद्या बोलणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.