अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. लक्ष्मण हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर ज्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केला त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर हाकेंवर झालेल्या हल्ल्यानंतर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला या हल्ल्याबाबत मनोज जरांगे यांनी हाके यांनी प्रसिद्धीसाठी स्वतःवर हल्ला झाल्याचा स्टंट केला असल्याचं म्हटलं आहे. मनोज जरांगे म्हणाले की, "स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते प्रसिद्धीसाठी गाड्यावर हल्ले करून घेतात. त्या विषयावर मला बोलायचं नाही, या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचे नाही. दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात हे सगळं प्रसिद्धीसाठी सुरु आहे". दरम्यान मराठा नेते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली असून छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल आहे. जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जरांगेंनी केलेल्या टीकेनंतर यावर लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. जरांगे यांचं डोकं फिरलं आहे असम म्हणत, सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात कोणी स्वतःवर हल्ला करून घेत का? असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना केला आहे. तसेच जी लोक पकडली आहेत ती कोणाची आहेत हे तपासा असा आदेश लक्ष्मण हाकेंनी पोलिसांना दिला आहे.