अंतरवाली सराटीत सरपंचाच्या शेतात मनोज जरांगेंनी घोडेस्वारी केली आहे. आज सकाळपासून जरांगे यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलकांनी गर्दी केली होती. त्यातच भिष्मा चव्हाण नावाच्या एका आंदोलकाने जरांगे यांना बसण्यासाठी घोडा आणला होता.
त्यामुळे जरांगे यांनी घोड्यावर बसून सरपंचाच्या शेतात फेरफटका मारला आहे. दरम्यान यावेळी जरांगेंनी चष्मा घालत "आपलाच आहे का?" असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.