मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण सुरु करण्यात आले होते. मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असून त्यांनी याआधी सात टप्प्यात उपोषण केल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसानंतर उपोषण स्थगित केल्याचे पाहायला मिळत आहे.
सहा दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितची मिळत असून पत्रकार परिषदेतून जरांगे काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.