थोडक्यात
मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला नवा अल्टीमेटम
5 जानेवारीपर्यंत आरक्षणावर तोडगा काढण्याची मागणी
महायुती सरकारला शुभेच्छा देत आरक्षणाची मागणी
महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार आता स्थापन झाले आहे. आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणे गरजेचे आहे. समाजात खदखद आहे ही त्यांना दिसत नसेल पण ती भयंकर लाट आहे. ते परेशान होऊन जातील.
यासोबतच ते म्हणाले की, 5 तारखेला काल त्यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. मनापासून तिघांचे अभिनंदन केलं आहे. पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे. येत्या 5 जानेवारीपर्यंत 1 महिन्यात त्यांनी तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. नसता हे मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार. 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.