मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी सोमवारी रात्री १२.३० पासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावत यावर चर्चा करत तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात त्यांनी सरकारकडून उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली. उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता जरांगे पाटील यांची तपासणी केली. तसेच त्यांना सलाईन लावली.
याच पार्श्वभूमीवर आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार असून दुपारी दोन वाजता ते त्यांच्या सहकार्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.