Manoj jarange Patil vs Devendra Fadnavis 
ताज्या बातम्या

"सत्तेचा गैरवापर करुन फडणवीस दहशत आणि दडपशाही निर्माण करतात", मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा जहरी टीका केलीय.

Published by : Naresh Shende

मराठा आंदोलक मनोज-जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधनाता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस साहेब तुम्ही जितके गुन्हे दाखल केले आहेत, तेवढाच समाज उफाळून निघाला आहे. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर सुरु करुन दशहत आणि दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.

जरांगे पुढे म्हणाले, फडणवीस मला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी राजकारणात असो किंवा नसो, पण मी मराठ्यांच्या पाठिशी आहे आणि हटणार नाही. सर्वांनी ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवारी फॉर्म भरायचा, इतके फॉर्म भरल्यावर आपण अडचणीत येऊ. मी राजकारणात येणार नाही. १७ - १८ मतदार संघात वर्चस्व आहे. तिथं निर्णय घेतल्यास कुणीही निवडून येऊ शकत नाही. तुम्ही सरकारला उन्हात उभे करू शकता. ७५ वर्ष फक्त आपण सहन केलं आहे. काही झालं तरी लेकरांपेक्षा मोठं कुणी नाही. ज्यांना मोठे केले, ते लेकरांच्या मुंडक्यावर पाय देत आहेत. सरकारला वेळ दिला. त्याचा फायदा सरकारने घेतला आहे.

आपली लढाई लढायची आहे आणि जिंकायची सुध्दा. समाजाची मान खाली जाईल, असं एकही पाऊल उचलले नाही. समाजासाठी आयुष्यभर जेल भोगावा लागला तरी भोगेल. ५७ लाख नोंदी मिळाल्या. सव्वा लाख लोकांना लाभ मिळाला. नोंदी मिळाल्यानंतर वाटप बंद केले होते. आपण दिलेले अर्ज थांबवले आहेत. सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत. मंत्र्यांच्या सांगण्यावरून मुलांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. अंतरवालीत बैठकीला जाऊ दिले नाही. आता तुम्हाला घरी बसवणार. पोलीस अधिक्षकांनी महिलांना बसवून ठेवलंच कसं ? आता मागे हटायचं नाही.

विधानभवनात 'करेक्ट कार्यक्रम' म्हणून गरळ ओकली. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा कमी होत आहे. दोन वर्षांत मराठ्यांच्या लेकराचां नोकरीत टक्का असेल. ज्यांना सावलीत बसवले, त्यांना उन्हात येऊ द्या. सरकारी धोरण आणायला सर्व ताकदीचा वापरा करावा लागेल. न्यायाधीशांनी काढलेला शब्द, नोंदीच्या आधारे आरक्षण द्यायचे. मात्र, आपल्या व्याख्यानुसार निर्णय घेतले नाहीत. तर ते त्यांच्या व्याख्याने चालत आहेत, असंही जरांगे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया