ताज्या बातम्या

Manoj Jarange : "ओबीसींचा आकडा फुगवून दाखवला...", जातीनिहाय जनगणनेबद्दल मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

ही जनगणना होणं गरजेचं होतं. तसेच ही चांगली गोष्ट आहे असे जरांगे म्हणाले.

Published by : Shamal Sawant

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील उमटल्या. मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ही जनगणना होणं गरजेचं होतं. तसेच ही चांगली गोष्ट आहे असेही जरांगे म्हणाले.

काय म्हणाले मनोज जरांगे ?

याआधीची जनगणना ही इंग्रजांनी केलेली होती. इंग्रजांनंतर जनगणनाच झाली नव्हती. ओबीसींचा आकडा फुगवून दाखवला होता, असा मोठा दावाही त्यांनी केला. अतिक्रमण करून जास्तीचं आरक्षण दिलं होतं. आता जातीनिहाय जनगणनेमुळे ते उघडं तरी पडेल. तसेच आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल", असेही जरांगे म्हणाले.

नंतर जरांगे म्हणाले की, "सरकारला जनगणना करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आताच बाठीया आयोगाने निर्णय दिला आहे पण सरकारची इच्छा असेल तर आमचा विरोध असणार नाही. आता जातीनिहाय जनगणनेसाठी जो आयोग गठीत केला जाईल किंवा समिती असेल त्यावरील लोक निःपक्षपाती काम करणारे असावेत", असे जरांगे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा