मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली. याचसोबत त्यांनी सरकारकडे उर्वरीत 2 मागण्या 15 दिवसांत पूर्ण करा अशी मागणी देखईल केली. या 15 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत सरकारने उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
...अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार, जरांगेंचा सरकारला इशारा
मनोज जरांगे म्हणाले की, पंधरा तारखेला साखळी उपोषण करण्याच जाहीर केलेल आहे. त्याच कारण असं होत की, सरकारच्या म्हणण्यानुसार आपण ते उपोषण थांबवलं. पंधरा तारखेला साखळी उपोषण राज्यव्यापी करायचं ठरवलं होतं ते दहा-पंधरा दिवस पुढे ढकलतो आहे. सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं सरकार काम करत असेल तर सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिला पाहिजे.
पण, उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती. काल दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच कौतुक करतो चार पैकी दोन मागण्यांसाठी त्यांनी तयारी दाखवली. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करून म्हणून उल्लेख केला आहे. सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्याचा वेळ लागणार असल्याच त्यांनी सांगितलं. नुसत शिंदे समितीला मुदतवाढ देऊन उपयोग नाही, तिला मनुष्यबळ द्या आणि कक्ष स्थापन करून द्या. राहिलेले दोन मागणीची आठ पंधरा दिवसात अंमलबजावणी करा.