Manoj Jarange Hunger Strike on hold 
ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil Jalna : सगेसोयरेची अंमलबजावणी करा अन्यथा...; जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा

मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Published by : Gayatri Pisekar

जालन्यातील अंतरवाली सराटीमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणला बसले होते. जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. तसेच उपोषण स्थगित करत आहोत बंद नाही अशी घोषणा जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांनी पाणी पित उपोषण स्थगित केलं आहे. तर आता मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुरेश धस आणि सोनावणे यांच्या शिष्टाईला यश

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते बजरंग सोनावणे दाखल झाले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्या ८ मागण्यापैकी ४ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरेश धस आणि सोनावणे यांच्या शिष्टाईला यश आल्याचं बोललं जात आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं. तसेच उपोषण स्थगित करत आहोत बंद नाही अशी घोषणा जरांगे यांनी केली आहे. आता यापुढे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार नाही. आता उपोषण करायचं नाही तर समोरासमोर लढायचं असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा. अन्यथा मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे यांनी केलेल्या ८ मागण्यांपैकी ४ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

काय आहेत मनोज जरांगे यांच्या मागण्या?

  • सगेसोयरेची अंमलबजावणी लवकर करा, नाहीतर मुंबईची तारीख जाहीर करू

  • मुंबईला 2 कोटी मराठे जाऊ, अंमलबजावणी करूनच परत येऊ

  • मुंबईत आम्हाला हात लावल्यास आमदार, मंत्र्यांचंही ऐकणार नाही

  • शक्यतो आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं

  • शिंदे समितीकडे हैदराबाद गॅझेट, त्याची अंमलबजावणी करा

  • राज्यातील सर्व आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्या

  • जातीयवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं

  • मोडी लिपी अभ्यासकांना सरकारने त्यांचं मानधन द्यावं

मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे एकमेव योद्धे- बजरंग सोनावणे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांच्या ८ पैकी ४ मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलन स्थगित केलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उपस्थित समुदायाकडूनही उपोषण सोडलं जात आहे. लोकांना जरांगे यांची चिंता वाटत होती ते आता शांत झाले आहेत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला विषय आहे. मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे एकमेव योद्धे आहेत. समाजासाठी लढलंच पाहिजे ही त्यांच्या मनातील इच्छा असल्याने ते लढतात.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश