मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. कोर्टाने त्यांना या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाकारली असली तरी पोलिसांनी विशिष्ट अटींसह केवळ एक दिवसासाठी आंदोलन करण्याची मुभा दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.
मनोज जरांगेंनी पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. मराठा आरक्षणाचा गुलाल घेऊनच पुन्हा आपल्या गावी परतणार असल्याची ठाम भूमिकेत आहेत. लाखो मराठा बांधव मनोज जरांगेच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात थेट सहभागी होणार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार परभणीतील खासदार संजय बंडू जाधव आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित राहतील.
मनोज जरांगे आझाद मैदानावर पोहचण्याआधी अनेक मराठा बांधव मैदानावर दाखल झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी स्वयंपाकासाठी साहित्य नेले असले तरी पोलिसांनी मैदानावर स्वयंपाक करण्यास परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला तीव्र विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.